शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आता ई डी कडे

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लालचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्याचे प्रकरण ई डी कडे सोपवलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत केली , याबाबतचा प्रश्न चर्चेला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या अशी काही प्रकरणे ई डी कडे सोपवली जातील आणि acb कडून पकडलेल्या लोकांसाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करून अथवा नवीन कायदा आणून कारवाई केली जाईल असं ही फडणवीस म्हणाले.
अनुदानित शाळा व्यवस्थापन परस्पर चुकीची भरती करून मग शिक्षण विभागाशी संगनमत करून गैरप्रकार करतात त्यामुळे शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने करण्याचं, रोस्टर मंजुरी नसलेल्या शाळांचं अनुदान बंद करण्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील शाळांची पट पडताळणी झाली , आता आधारनोंदणी लिंक करणे सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर वीस ते पंचवीस टक्के इतक्या प्रमाणात बोगस विद्यार्थी सापडतील असे ही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ML/KA/SL
27 July 2023