कंत्राटी पोलीस भरती केलीच जाणार नाही
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, पोलीस कोणत्याही प्रकारे कंत्राट पद्धतीने घेणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन्ही सभागृहात दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. Contract police will not be recruited
पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भर्ती करण्याचा निर्णय झालेला नाही, तसा विचार देखील नाही असं आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेतही निवेदनाद्वारे स्पष्ट केलं.
कोविडच्या संकटामुळे गेली तीन वर्षे भर्ती झाली नाही त्यामुळे पोलिसांची अनेक पदं रिक्त आहेत, मुंबई सारख्या मोठ्या शहराची सुरक्षा लक्षात घेता,या रिक्त जागा भरे पर्यंत सरकारच्याच राज्य सुरक्षा महामंडळातल्या जवानांना काही आस्थापनांवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या पूर्वीही अशा प्रकारे सुरक्षा महामंडळाच्या जवानांना तैनात करण्यात आलं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
ML/KA/PGB
26 July 2023