झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आपचे आंदोलन

 झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आपचे आंदोलन

मुंबई, दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : भाजपच्या कुशासनाने मणिपूर पेटून उठले आहे. महिलांची छेडछाड थांबण्याचे लक्षण दिसत नाही, हजारो लोक बेघर झाले आहे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपचा मणिपूर राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मोदी सरकार मात्र परदेशवारी करत मुग गिळून गप्प आहे. मणिपूर विषयी मोदी सरकरला उत्तर द्यावे लागेल. आम आदमी पार्टी मणिपूरच्या जनतेला न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचे मत आम आदमी पार्टीच्या नेत्याने आंदोलना दरम्यान व्यक्त केले.

मणिपूरचे नागरिक त्यांच्या घटनात्मक आणि मानवी हक्कांपासून वंचित आहेत. मणिपूर येथे गेल्या जवळ जवळ तीन महिन्यापासून सतत हिंसा तसेच महिलांवर अत्याचार होत असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे. असे असताना ही झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जाग येत नाही आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम आदमी पार्टी तर्फे संपूर्ण देशात विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. त्यावेळी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या नेतृत्वाखाली आजाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आम आदमी पार्टीचा मुंबईचे कार्याध्यक्ष द्वीजेंद्र तिवारी, सुमित्रा श्रीवास्तव, उपाध्यक्ष मेहमूद देशमुख, पायस वर्गीस, संदीप कटके, टिळकराज शर्मा, मीनल जैन व इतर नेते आणि पदाधिकारी कार्यकर्तेसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान आम आदमी पार्टीच्या नेते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे वृत्तवाहिनी समोर ओरडणाऱ्या भाजप सरकारच्या स्पष्टपणे पोल उघडलेली आहे. महिला खेळाडूंनी देशासाठी पदके आणली, त्यांनाच कुचलण्याचे काम या निष्टुर भाजप सरकारने केले. मणिपूर मध्ये महिलांवर अत्याचार होत आहे, ही घटना अत्यंत चिड आणणारी आहे. वाईट कृत्य मनिपुर मध्ये सुरू असताना माननीय पंतप्रधान परदेशीवारी करण्यात रमलेले दिसले, पंतप्रधान मोदी मणिपूर मध्ये चालेले हिंसाचार विरोधी भाष्य का करत नाही? असे खोचक सवाल त्यावेळी आम आदमी पार्टीचे नेत्यांनी उपस्थित केला.

मणिपूर घटनसंदर्भात शांतता समिती स्थापन करून मोदी सरकार शांत बसले आहे. मणिपूरमध्ये जे काही घडत आहे, त्यात हस्तक्षेप करणे ही मोदी यांच्या जबाबदारी आहे. पण देशाचे पंतप्रधान मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते. मणिपूरची जनता केंद्र सरकारच्या मदतीची आस लावून बसली आहे, मात्र मोदी माणिपूरमध्ये फिरकण्यास किंवा इथल्या हिंसाचाराविषयी एक अक्षरही उच्चारण्यास तयार नाहीत. आधी महिला कुस्तीपटूंचे आंदोलन आणि पाठोपाठ मणिपूरमधील हिंसाचार अशा दोन महत्त्वाच्या प्रकरणांत त्यांनी बाळगलेले मौन अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत आणि याचा आम्ही निषेध करत राहणार आहोत. जनता रस्त्यावर उतरून भाजपला प्रत्येक विष्यांवर प्रश्न विचारतील आणि त्यामुळे मोदी सरकार पळत आहेत. मणिपूरच्या जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी गप्प बसणार नाही, असे खोचक वक्तव्य प्रीती शर्मा मेनन यांनी केले.

SW/KA/SL

25 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *