एस टी बस राजूर घाटात कोसळली, 20 प्रवासी जखमी…

बुलडाणा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राजूर घाटात एसटी महामंडळाची बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे. मलकापूर येथून बुलढाणा कडे 55 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला राजूर घाटात बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने ही बस पुढील दरीत कोसळली नसल्याने मोठी जीवित हानी यावेळी टळली आहे. मात्र एसटी महामंडळाच्या बसला सातत्याने होत असलेले अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. या बस अपघातात तब्बल 15 ते 20 प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले आहेत.
काही प्रवाशांना मुका मार लागला आहे. तब्बल 55 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये अनेक विद्यार्थी देखील प्रवास करत होते. महामंडळाच्या भंगार बसेसचा मुद्दा पुन्हा एकदा या अपघाताने ऐरणीवर आला आहे. बसमधील प्रवाशांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने बसचे काच फोडून बाहेर काढण्यात आल आहे. सर्व जखमींना बुलडाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
ML/KA/SL
25 July 2023