मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने केल्या उपाययोजना

 मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने केल्या उपाययोजना

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे ते वडपे हा मुंबई नाशिक महामार्गावरील २१ किमी चा टप्पा आठपदरी रस्ता ऑगस्ट २४ पर्यंत पूर्ण करून या दरम्यान होणारी नेहमीची वाहतूक कोंडी सोडवली जाईल अशी माहिती सार्वजनिक उपक्रम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. हा रस्ता २०२१ साली राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून राज्याच्या सार्वजनिक उपक्रम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे .

हा प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता, त्यावर शांताराम मोरे , बाळासाहेब थोरात आदींनी उपप्रश्र्न विचारले. रस्त्याचा हा भाग पुढे समृद्धी मार्गाला जोडला जात आहे, सध्या त्याचे काम तीस टक्के पूर्ण झालं आहे, मूळ आठ रस्ता आणि त्याबाजूला प्रत्येकी दोन पदरी सर्व्हिस मार्ग असा बारा पदरी रस्ता केला जाणार आहे. त्यादरम्यानच्या काळात भिवंडी परिसरात होणारी रोजची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्या दरम्यानचे रस्त्यावरचे खड्डे तातडीने भरले जातील असं मंत्री म्हणाले.

या रस्त्यावरील २५ ठिकाणचे रस्ता वळणे बंद करून वाहतूक सुरळीत ठेवली जात आहे, अवजड वाहनांना गर्दीची वेळ टाळून इतर वेळी परवानगी दिली जाईल, लहान वाहनांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून दिली जाईल , शेजारील मुंबई महापालिकेचा जलवाहिनी रस्ता उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि गस्ती पथके तैनात केली जातील असं ही मंत्री भुसे यांनी सांगितलं.

ML/KA/SL

25 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *