निधीच्या वाटपात अजिबात भेदभाव नाही

 निधीच्या वाटपात अजिबात भेदभाव नाही

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निधीच्या बाबतीत कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत विरोधकांचे असमान निधी वाटप होत असल्याबद्दलचे आरोप फेटाळून लावले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षात विरोधी पक्षाच्या आमदारांना एकही रुपयाचा निधी मिळाला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं, मात्र आमचं सरकार अशाप्रकारे भूमिका घेणार नाही यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षातील आमदारांना देखील निधी देण्यात आला असून ,त्यांच्या मतदारसंघातील ज्या कामांना स्थगिती देण्यात आली, ती मेरीटनुसार उठवण्यात येत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांना निधी वाटपात अन्याय केला जात असून सत्ताधारी आमदारांना झुकतं माप दिलं जात आहे, असा आरोप विरोधकांनी आज विधानपरिषदेत केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत सर्व आमदारांना निधीचं समान वाटप करावं अशी मागणी केली.निधी न देऊन सरकार त्या लोकप्रतिनिधिंवर आणि त्यांच्या मतदारसंघातील लोकांवर अन्याय करत आहे असं ते म्हणाले. यासंदर्भात सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली.आमदारांच्या निधीविषयी सरकार काही धोरण आखणार आहे का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यासंदर्भात राजकारण न करता सरकारने निधीचं समान वाटप करण्याची मागणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली.

ML/KA/SL

24 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *