पावसाचा जोर अद्याप कायम; मात्र जनजीवन सुरळीत…

रत्नागिरी, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरी जनजीवन मात्र सुरळीत सुरू आहे. खेड येथील जगबुडी आणि राजापूर येथील कोदवली नदी इशारा पातळीवर वाहत आहे. तर इतर नद्यांची पाणी पातळी सध्या सामान्य आहे.
चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरात सायंकाळी ४ तासात ७४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वशिष्ठी नदीची नाईक पुलाजवळील पाण्याची पातळी वाढून ४.०२ मी वर पोहचली. त्यामुळे सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात इतरत्र किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने दळणवळणासाठी अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान हवामान विभागाकडून 27 जुलै पर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ML/KA/SL
24 July 2023