तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू , सतर्कतेचा इशारा

 तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू , सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे . यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांची स्थिती समाधानकारक झाली आहे. 16 लघुपाटबंधारे तसेच 3 मध्यम पाटबंधारे प्रकल्प धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे . आंतरराज्य तिलारी मुख्य धरणाचा कालपासून सांडवा प्रवाहीत झाला आहे. Water discharge from Tilari dam has started, alert warning

आज सकाळी 8 वाजता सांडवा पाणी पातळी 106.70 मी इतकी असून तिलारी नदीमध्ये 165.814 घन मीटर प्रति सेंकद इतक्या वेगाने सांडव्यातून विसर्ग सुरु आहे. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारे पर्जन्यमान पाहता सांडव्यातील विसर्गात वाढ होऊन तिलारी नदीची पाणी पातळी वाढू शकते.याबाबत यापूर्वीच नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्या बदद्ल सूचित करण्यात आले आहे. तसेच सर्व संबंधीत गावांना या कार्यालयामार्फत यापुर्वीच सायरन वाजवून इशाराही देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका प्रशासन आणी जिल्हा आपत्ति व्यवस्थापन कक्ष यांच्याशी सांडव्यावरील विसर्ग, नदी पातळी, धरण पाणी पातळी याबाबत सकाळी व सांयकाळी माहिती अद्यावत करण्यात येत आहे . नदी काठच्या ग्रामस्थांनी तसेच शेतक-यांनी नदीपात्रात उतरु नये व योग्य ती सावधनता व खबरदारी बाळगावी अशी सूचना विभागाने केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी देखील तिलारी परिसराची पाहणी करत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

ML/KA/PGB
23 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *