इर्शांलवाडी शोधकार्याला पूर्णविराम ,२७ मृत्यू , ५७ बेपत्ता घोषित

 इर्शांलवाडी शोधकार्याला पूर्णविराम ,२७ मृत्यू , ५७ बेपत्ता घोषित

अलिबाग, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेले चार दिवस सुरू असलेले रायगड जिल्ह्यातील इरशालवाडी येथील दुर्घटनेतील
शोधकार्य रविवारी संध्याकाळी पूर्णविराम देण्याचा निर्णय रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. Irshanlawadi search operation called off, 27 dead, 57 missing declared

दुर्घटनेत 57 जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. बुधवार रात्री सव्वा अकरा दरम्यान इर्शांळवाडीवर दरड कोसळल्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू झाले होते. गुरुवारी पहाटेपासून राष्ट्रीय आपत्ती कृती दलाचे पथक, विविध सामाजिक संस्था ,स्थानिक तरुण दरडी खाली अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धडपडत होते.

रविवार दुपारपर्यंत 27 मृतदेह हाती लागले होते. दोन कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. वाडीतील सुरक्षित कुटुंबातील नातेवाईकांशी बोलून प्रशासनाने रविवारी संध्याकाळी शोध कार्य थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.यावेळी दिलेल्या माहितीनुसार 57 जण बेपत्ता असून 43 कुटूंब वास्तव्यास होती.

141 लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येणार आहे ‌.रविवारी सायं 5:30 वाजता रेस्क्यू आॅपरेशन थांबविण्यात आले.यात 22 मुले अनाथ झाली आहेत.
अशी घटना पुन्हा होवू नये म्हणून पाच आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

इरशाल गड परिसरात कलम 144 अंतर्गत बंदी घालण्यात आली असून हा परिसर संरक्षित जाळी लावून बंद करण्यात येणार आहे पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात येणार आहेत. माध्यमातून देखील पर्यटकांमध्ये जागृती करावी असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

ML/KA/PGB
23 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *