विधी आयोग नव्याने जाणून घेणार समान नागरी कायद्याची गरज

नवी दिल्ली, २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप सरकारच्या निवडणूक अजेंड्यांचा महत्त्वाचा भाग असलेल्या समान नागरी कायद्याबाबत सध्या देशभर चर्चा सुरू आहे. २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांमुळे केंद्र सरकारने आता समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय विधी आणि न्याय आयोग समान नागरी कायद्याची गरज नव्याने जाणून घेणार आहे.
या बाबत विधी आयोग आता सार्वजनिक, धार्मिक संस्था तसेच समाजातील विविध स्तरांतील लोकांची मते आजमावणार आहे. या कायद्याचे महत्त्व आणि या बाबत न्यायालयांनी आजवर दिलेले निकाल लक्षात घेता या विषयावर लोकांकडून मते मागवण्याचे तसेच या कायद्या बाबत नव्याने सर्वांगिण विचार करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. नागरिक आणि सामाजिक तसेच धार्मिक संस्थांनी येत्या ३० दिवसात समान नागरी कायद्या बाबतची मतमतांतरे विधी आयोगाला कळवायची आहेत.
SL/KA/SL
22 July 2023