सहा महिन्यात 80 हजारांहून अधिक लोकांनी सोडले भारतीय नागरिकत्व

 सहा महिन्यात 80 हजारांहून अधिक लोकांनी सोडले भारतीय नागरिकत्व

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

आर्थिकदृष्ट्या संपन्न भारतीय नागरिक अधिक गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्यासाठी परदेशात स्थायिक होताना दिसतात. मात्र गेल्या काही दिवसात भारतीयांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्विकारणाच्या घटनांमधये लक्षणिय वाढ झाली आहे. कमी कालावधीत हजारोंच्या संख्येने होणारे भारतीयांचे परदेशागमन काळजीत टाकणारे आहे. या बाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. या वर्षी जूनपर्यंत तब्बल 87,026 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे. परदेशातील भारतीय समुदाय ही देशाची संपत्ती आहे, यावर जयशंकर यांनी भर दिला. ते म्हणाले की, सरकारने परिवर्तनात्मक बदल घडवून आणला आहे. एक यशस्वी, समृद्ध आणि प्रभावशाली डायस्पोरा हा भारतासाठी एक फायदा आहे.

लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, 2,25,620 भारतीयांनी 2022 मध्ये नागरिकत्वाचा त्याग केला. 2021 मध्ये 1,63,370, 2020 मध्ये 85,256, 2019 मध्ये 1,44,017, 2018 मध्ये 1,34,561,2015 मध्ये 31,489 भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला. तसेच 2014 मध्ये 1,29,328, 2013 मध्ये 1,31,405, 2012 मध्ये 1,20,923 आणि 2011 मध्ये 1,22,819 भारतीयांनी त्यांचं भारतीय नागरिकत्व सोडलं. अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे.

पुढे बोलतांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, मोठ्या संख्येने भारतीय नागरिक भारत सोडून इतर देशात जात आहेत. शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या अनेक भारतीयांनी वैयक्तिक सोयीसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारले असून त्यांनी यासाठी पसंती दिली आहे.

SL/KA/SL

22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *