सात्विक -चिराग कोरिया‌ ओपनच्या अंतिम फेरीत

 सात्विक -चिराग कोरिया‌ ओपनच्या अंतिम फेरीत

सेऊल, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने गतविजेत्या चीनच्या वेई केंग लियांग-चांग वांग या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव केला. भारतीय जोडीने दुसऱ्या मानांकित चीनच्या जोडीचा 21-15, 24-22 असा पराभव केला.

आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये सात्विक-चिराग जोडीने वेई कांग आणि वांग चांग या जोडीला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय जोडीने या वर्षातील त्यांच्या तिसऱ्या BWF वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सात्विक-चिराग जोडीने उपांत्य फेरीत जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी जोडीचा 21-14, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. हा सामना 40 मिनिटे चालला.

पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांसारखे उर्वरित भारतीय खेळाडू याआधीच स्पर्धेतून बाहेर पडले असल्याने या स्पर्धेतील भारतीय आशा सात्विक-चिराग जोडीवर टिकून आहेत.कोरिया ओपनचा निकाल पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या पात्रता क्रमवारीत मोजला जाईल.

SL/KA/SL

22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *