सिंधुदुर्गात पाऊस मंदावला

सिंधुदुर्ग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस अक्षरशः कोसळत होता . मुसळधार कोसळणाऱ्या या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर तसेच कोकण रेल्वे वाहतुकीलाही बसला.
आज मात्र वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे .आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे . आज सकाळी आठ वाजता नोंद झाली.
गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण सरासरी 150.2 मिलिमीटर पाऊस पडला कुडाळ येथे सर्वात जास्त 207.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . तर सावंतवाडी येथे 176.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे . आज जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.
ML/KA/SL
21 July 2023