शेतीमालाचा बाजारभाव आणि उत्पन्न यासाठी नियंत्रण यंत्रणा

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्याने विकत घेतल्यानंतर पेरलेले बियाणे , त्यांचं येणारं उत्पन्न आणि त्या पिकाची बाजारात असणारी मागणी याचा समन्वय साधणारी आणि नियमन करणारी यंत्रणा उभारण्यात येईल , त्यातून बाजार मालाच्या किमती वर नियंत्रण साधता येईल अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर उपस्थित केलेल्या नियम २९३ च्या चर्चेला ते उत्तर देत होते.
शेतीमालाचे भाव कधी वाढतात तर कधी एकदम पडतात यावर हा उपाय असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील बोगस बियाणे आणि खतांच्या अवास्तव साठा , वरचढ दराने विक्री, मुख्य खतासोबत इतर अनावश्यक बाबींच्या गोष्टीची सक्तीने विक्री आदी तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी तोच वॉट्स ॲप क्रमांक असून त्यावर शेतकऱ्यांनी आपल्या थेट तक्रारी कराव्यात , कृषी विभाग तातडीने कारवाई करेल आणि तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
एक रुपयात पीक विमा योजनेत ७८ लाख २२ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, ३१ जुलै पर्यंत त्याची मुदत आहे , त्यामुळे या संख्येत आणखी मोठी वाढ होईल असं ही मुंडे म्हणाले. नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्य सरकारचा पहिला हप्ता पुरवणी मागण्या मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल , ती रक्कम चार हजार कोटींची आहे.
बोगस बियाणे जप्त करून कारवाई केल्यावर ते नाव बदलून पुन्हा बाजारात येतं, ते रोखणारी प्रणाली सध्या उपलब्ध नाही, ती विकसित केली जाईल आणि त्यासाठी dash बोर्ड तयार करण्यात येईल अशी ग्वाही कृषिमंत्री मुंडे यांनी आपल्या उत्तरात दिली.
ML/KA/SL
20 July 2023