आदिवासींसाठी राज्यात येणार नवीन योजना

 आदिवासींसाठी राज्यात येणार नवीन योजना

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील आदिम जमातींना घर , रोजगार ,शिक्षण यासह सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक योजना लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.New scheme coming in state for tribals

आवास योजनेतून घरं तयार करून देण्यासाठी या आदिम जमातीच्या लोकांकडे जमीनच उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना वनविभागाची जागा उपलब्ध करून दिली जाईल किंवा त्यांना जमीन खरेदी करून देण्यात येईल तसंच या आदिम जमातींचं स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

आदिम जमातींचं मागासलेपण अधिक असल्यामुळे आदिवासींच्या योजना या जमातींना लागू करण्यात अडचणी येतात असं सांगत सर्वसमावेशक योजना तयार करताना आवश्यक त्या शिथिलता देण्यात येतील, असं फडणवीस यांनी सांगितलं.

ML/KA/PGB
20 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *