मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील पूरस्थीतीचा आढावा
मुंबई दि १९-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि गडचिरोली येथील परिस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले.
ML/KA/SL
19 July 2023