सहारा इंडीयामध्ये बुडालेले पैसै परत मिळणार

 सहारा इंडीयामध्ये बुडालेले पैसै परत मिळणार

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिट फंड घोटाळ्याच्या बातम्या तर अनेकदा होतात. पण या घोटाळ्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची घटना दुर्मिळच. पण सहारा समूहाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना आता त्यांचे पैसे परत मिळायला सुरुवात झालीय. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यासाठी एका विशेष पोर्टलचं उद्घाटन नुकतंच केलंय. निकषांमध्ये बसणाऱ्या गुंतवणूकदारांना 45 दिवसांत त्यांची रक्कम परत मिळेल असा दावा सरकारनं केलाय.

सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमधे पैसे गुंतवणाऱ्या लोकांसाठी हा दिलासा असेल. पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपयापर्यंतची रक्कम परत मिळेल. तर अधिक पैसे गुंतवणाऱ्या लोकांना नंतर 50 हजार रुपयापर्यंतची रक्कम मिळेल अशी योजना आहे.

सहाराच्या जवळपास पावणे दोन कोटी छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार असून 5 हजार कोटी रुपयांची रक्कम गुंतवणूकदारांना वाटली जाणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सहारा इंडिया रिफंड पोर्टल (Sahara India Refund Portal) सुरू केले आहे. या पोर्टलला “सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक सहारा पोर्टल (Central Registrar of Cooperative Societies-Sahara Portal)” असे नाव देण्यात आले आहे. ज्यांचे पैसे सहारा इंडियामध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. अशा लोकांचे तपशील CRCS सहारा रिफंड पोर्टलमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. याबरोबरच पैसे परत मिळण्याबाबतची सर्व महत्त्वाची माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल.

SL/KA/SL

19 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *