वाशीम जिल्ह्यात धो धो!, नदी नाल्यांना पूर

वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मागील १४ तासांपासून सततधार पाऊस सुरू असल्यामुळे अडान नदीला पूर आला आहे.
या मुसळधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यात पूर परिस्थितीमुळे पिंपरी खरबी गावचा संपर्क तुटला असून असाच मुसळधार पाऊस चालू राहिल्यास अडाण नदीचे पाणी गावात शिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वनोजा येथील वनोजा फाटा ते वनोजा दरम्यान असलेल्या पाचमोरा पुलाला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे प्राध्यापक, शिक्षक, तसेच गावकरी मंडळी व शेतात गेलेले शेतकरी फाट्यावरच अडकून पडले आहे. शेलुबाजार-वनोजा पिंजर या गावादरम्यानचा संपर्कही तुटला आहे.
ML/KA/SL
19 July 2023