एकनाथ शिंदे यांनी केले मोदींचे स्वागत

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील हॉटेल अशोका येथे पोहोचले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित आहेत.
ML/KA/SL
18 July 2023