सोमय्या चित्रफीत प्रकरणी , वरिष्ठ स्तरीय चौकशी
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत काल प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह चित्रफिती बाबाबत वरिष्ठ स्तरावरील सखोल चौकशी केली जाईल असं आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं.
या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. याला उत्तर देताना फडणवीस यांनी हा विषय गंभीर असून विरोधकांनी मांडलेल्या भावनांशी सहमत असल्याचं सांगितलं.
विरोधी पक्षांकडे याबाबद्दल काही तक्रारी आल्यास त्याचीही चौकशी करण्यात येईल, प्रकरण दडपलं जाणार नाही असं फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. In the Somaiya Chitrafeet case, a senior level inquiry
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी यावेळी बोलताना ,या माजी खासदारांना दिलेली सुरक्षा काढून घेण्याची आणि या चित्रफितीची सत्यता समोर आणण्याची मागणी केली.
बातम्यांमध्ये अशाप्रकारच्या चित्रफिती दाखवताना माध्यमांनी देखील काळजी घ्यावी असं उपसभापतींनी यावेळी सांगितलं.
ML/KA/PGB
18 July 2023