रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू…

रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू…
ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंग वर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात , अपघातात जीप मधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत .Six people died in a road accident.
काळी पिळी प्रवासी जीपला भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने प्रवासी जीप साठ फूट दूर फेकली गेली, या भीषण अपघात घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक दाखल होऊन पंचनामा करत सहा ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत. जखमींना ही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करून पोलीस तपास सुरू केला आहे
ML/KA/PGB
18 July 2023