पारदर्शक कारभारासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी आवश्यकच

 पारदर्शक कारभारासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी आवश्यकच

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिक्षण विभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी करावीच लागेल आधार पडताळणी थांबवता येणार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत स्पष्ट केलं.

राज्यात काही विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी न झाल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया सरकारने थांबवलेली नाही असं त्यांनी सांगितलं . शिक्षकांच्या संच मान्यतेच्या प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांची आधार कार्ड बोगस आढळल्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित करत आधार कार्ड पडताळणीची अट काढूम टाकण्याची मागणी केली याला केसरकर उत्तर देत होते.Aadhaar card verification of students is essential for transparent administration

सध्या साडे ९१ टक्के विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाली असून तोपर्यंत ५० टक्के शिक्षकांची भरती केली जाईल त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाल्यानंतर ३० टक्के भरती म्हणजे एकूण ८० टक्के शिक्षकांची भरती दोन टप्प्यात करण्यात येईल अशी माहिती केसरकर यांनी दिली.

शाळांना प्रचलित धोरणानुसार, अनुदान देण्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता, याला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी आतापर्यंत ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याची माहिती दिली. या अनुदानासाठी शाळांनी किमान आवश्यक कागदपत्र सादर करावीत असं त्यांनी सांगितलं.

ML/KA/PGB
18 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *