गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत …

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बेंगळुरू दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असून त्याचा 4 दिवसांचा PCR घेण्यात आला आहे..
दहशवादी अफसर पाशा हा यापूर्वी दोनदा नागपुरात आला होता. पाशाच्या नागपूर भेटीमागील कारण शोधण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत असल्याचे आज नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे…शहरातील धंतोली पोलिस पाशा यांच्या नागपूर दौऱ्याशी आणि गडकरींना आलेल्या धमकीच्या कॉलचे कनेक्शन शोधत आहेत..
2005 मध्ये पाशा बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामील होता. दहशतवाद्यांनी 28 डिसेंबर 2005 रोजी आयआयएससी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेतून बाहेर पडलेल्या प्रतिनिधींवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये आयआयटी- दिल्लीचे निवृत्त प्राध्यापक मुनीश चंद्र पुरी यांची हत्या झाली होती आणि इतर चार जण जखमी झाले होते.
न्यायालयाने 2011 मध्ये या प्रकरणात पाशा आणि इतर चार जणांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयेश पुजारी उर्फ कांथा याने पाशाशी संगनमत करून आणि योजना आखून गडकरींच्या कार्यालयात धमकीचे कॉल केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ML/KA/SL
17 July 2023