भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट गोसे धरणाचे 27 गेट उघडले.
![भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट गोसे धरणाचे 27 गेट उघडले.](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/07/Screenshot-2023-07-16-181840.png)
भंडारा, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हवामान खात्याने आज भंडारा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असून आज सकाळपासूनच पावसाने कधी मुसळधार तर कधी रिमझिम सुरुवात केली आहे. तर गोसेखुर्द धरणाची सध्याची पाणी पातळी 243.480 राखून ठेवण्यासाठी धरणाचे 33 पैकी 27 दार अर्ध्या मिटर ने उघडण्यात आले आहेत.
संपूर्ण जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतीचा कामाला वेग आलेला आहे. तसेच गोसे धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने आणि मध्यप्रदेशच्या संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्याच्या पुजारी टोला धरणातून पाणी सोडल्याने गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दार अर्ध्या मिटर उघडण्यात आले आहेत या मधून 2965.25 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नदी काठांच्या गावातील लोकांना सतत इशारा देण्यात आलेला आहे.
पावसाची परिस्थिती आणि वरून नदीत येणारा पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन दार कमी जास्त प्रमाणात उघडण्यात येणार असल्याचे धरण अधिकाऱ्यानी सांगितले आहे.
ML/KA/PGB
16 July 2023