पालिका प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना मिळणार संवाद कौशल्याचे धडे

 पालिका प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना मिळणार संवाद कौशल्याचे धडे


मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून पालिकेच्या प्रसूतिगृहात येणाऱ्या रूग्णांसोबत अधिक सौजन्य आणि समाधानपूर्वक संवादाचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुढाकार घेण्यात येणार आहे. Communication skill lessons will be given to the employees of the municipal maternity hospital


टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – TISS) या संस्थेद्वारे ‘वर्तन बदल संवाद ‘ प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा एकूण 42 कर्मचा-यांनी लाभ घेतला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व प्रसूतिगृहांमध्ये मिळून अश्या प्रकारचे एकूण 58 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.


महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते अंतर्गत एकूण 30 प्रसूतिगृहे आहेत.यामध्ये वर्षाला साधारणत: 17 हजार प्रसूती, 8 हजार 600 शस्त्रक्रिया, 5 लाख 28 हजार बाह्यरुग्ण तपासणी होतात. प्रसूतिगृहांमध्ये एकूण कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या अंदाजे 1 हजार 800 आहे. प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, रुग्णांशी सुसंवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य कार्यशाळामहत्त्वाची ठरणार आहे.

ML/KA/PGB
14 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *