चांद्रयान -३ चे प्रक्षेपण यशस्वी
श्रीहरीकोटा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते अवकाशात पाठवले. 16 मिनिटांनंतर चंद्रयान रॉकेटद्वारे कक्षेत प्लेस करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये उपस्थित होते. चांद्रयान ३ चं प्रक्षेपण पाहण्यासाठी २०० विद्यार्थी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात दाखल झाले आहेत.
या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. चांद्रयान-३ अंतराळयानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही 14 दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल.
चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मिशन लॉंच केले.
SL/KA/Sl
14 July 2023