राजधानीत पुराचा कहर, यमुनेचा प्रकोप
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील सर्व राज्यामध्ये पावसाचे थैमान सुरू आहे. याचा फटका राजधानी दिल्लीलाही बसला असून राजधानीला पूराचा विळखा बसला आहे. यमुनानदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने रस्त्यांवरून प्रचंड पाण्याचे लोट वाटत असून जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असून प्रचंड नुकसान झाल्याने सामान्य नागरिक धास्तावले आहेत.
मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या सकल भागामध्ये पाणी साचल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीच्या पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. मोठा निर्णय घेत पुढीला आदेश येऊपर्यंत दिल्लीच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे.बऱ्याच भागात नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. सिव्हिल लाइन्स, वजीराबाद, काश्मीरी गेट येथील काही भागांत पाणी साचलं आहे. यमुना नदीच्या पातळीत बरीच वाढ झाल्याने मागच्या 45 वर्षांचा रेकॉर्ड आधीच तुटला आहे. पुरामुळे राजधानी अडचणीत सापडली आहे. अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.दिल्लीमध्ये सखल भागात अजूनही पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
यमुनेचं पाणी राजधानीतील अनेक सखल भागात साचल्याने रस्त्यांना स्विमिंग पूलचे स्वरूप आलं आहे.सखल भागात पाणी साचल्याने तेथील नागरिकांना स्थलांतर करावं लागत आहे.लाल किल्ल्याचा परिसरही पुराच्या तडाख्यात सापडला आहे.
शहरातील वाढत्या पाण्यामुळे यमुना बँक मेट्रो स्टेशनवर एंट्री-एग्झिट बंद करण्यात आली आहे. दिल्लीतील ओल्ड यमुना ब्रिज येथे बस, ट्रक, डंपर हे पुराच्या पाण्यात अर्धे बुडाले असून परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाळा पुढील आदेश येऊपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहिर केले आहे. फक्त दिल्लीच नाही तर पंजाबमधील पूरस्थिती पाहून सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले.
पूरस्थिती वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली. राजधानीतील पूर जगाला चांगला संदेश देणार नाही. शक्य असल्याच हरियाणातील हथनीकुंड बॅरेजचे पाणी मर्यादित वेगाने सोडले जावे, असे केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दिल्लीत काही आठवडय़ांत जी-२० शिखर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. देशाच्या राजधानीतील पुराची बातमी जगाला चांगला संदेश देणार नाही. या परिस्थितीतून दिल्लीतील लोकांना वाचवावे लागेल, असे केजरीवाल म्हणाले.
SL/KA/SL
13 July 2023