GST Council मिटींग नंतर आता हे होणार स्वस्त

 GST Council मिटींग नंतर आता हे होणार स्वस्त

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे नुकत्याच पार पडलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या ५० व्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या वस्तू किंवा सेवांच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

हे होणार स्वस्त
कर्करोगाशी लढणारी औषधे, दुर्मीळ आजारांवरील औषधे
खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेलाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य (Fish Solubale paste) आणि एलडी स्लॅग(LD Slag)वरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
कच्चे आणि न तळलेले, वाळवलेले चिप्स आणि तत्सम पदार्थांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील जीएसटी दरही १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.

हे होणार महाग
जीएसटी कौन्सिलने मल्टी युटिलिटी व्हेईकल्स (MUV) वर २२ टक्के सेस लादण्यास मान्यता दिली आहे.
ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोमध्ये गुंतवलेल्या संपूर्ण रकमेवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SL/KA/SL

12 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *