गुन्हे शाखेने जप्त केली तब्बल वीस पिस्तुले

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वागळे इस्टेट येथील गुन्हे शाखा युनिट 5 ने कौशल्यपूर्ण तपास करून 20 गावठी पिस्टल 1 गावठी मशीन गन,2 मॅगझीनसह 280 जिवंत काडतूसा सह एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना 10 जुलै रोजी खात्रीशीर बातमी मिळाली होती की माजा नावाचा आरोपी पिस्टल विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठा घेऊन धुळे येथील पलासनेस या गावी येणार आहेत, त्या प्रमाणे युनिट 5 चे एक पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले, तिथे त्यांना या गुन्ह्यातील आरोपी नाव सुरजीतसिंग माजा उर्फ आवसिंग वय 27 वर्ष राहणार उमर्टिगाव पोस्ट बलवाडी तालुका वरली जिल्हा बडवानी राज्य मध्यप्रदेश हा एकूण 20 गावठी बनावटीचे स्टील पिस्टल,1 गावठी बनवटीची मशिनगन 2 मॅगझीनसह,280 जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी आला असताना ताब्यात घेतले,Twenty pistols were seized by the crime branch
या पिस्टल ची किंमत चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये असुन हा आरोपी कोणाला विकणार होता याचा तपास सुरु असून, हे पिस्टल त्याने कुठून आणले याचा ही तपास सुरु आहे,
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, वागळे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके,, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे व त्यांच्या सहकार्यांनी केला.
ML/KA/PGB
12 July 2023