ईडी संचालकांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने ठरवली बेकायदेशीर
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहमी राजकारणी आणि उद्योजकांना दणके देणाऱ्या ईडीला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. ईडीचे संचालक संजयकुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ बेकायदा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
३१ जुलैपर्यंत मिश्रा यांनी कार्यभार गुंडाळावा असे निर्देश न्या. बी.आर. गवई, न्या. विक्रमनाथ आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने दिले आहेत. कोर्ट म्हणालं आहे की, तिसऱ्या वेळी कार्यकाळ वाढवणं बेकायदेशीर आहे. मात्र, कोर्टाने डीएसपीई आणि सीव्हीसी कायद्यामध्ये केलेल्या बदलाला मान्यता दिलीये. ज्याच्या अंतर्गत केंद्र सरकार सीबीआय आणि ईडीच्या डायरेक्टरला दोन वर्षांच्या निश्चित काळानंतर ३ वर्षांचा सेवा विस्तार कार्यकाळ देऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला नसता तर मिश्रा १८ नोव्हेंबर पर्यंत सेवेत राहीले असते. मिश्रा यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या मुदतवाढी विरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या संदर्भात न्यायालयाकडून सविस्तर उत्तर मागवले होते.
SL/KA/SL
11 July 2023