जगातली पहिली AI Robot परिषद
जीनिव्हा, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जगभर AI तंत्रज्ञानाचा अवलंब हा ट्रेंडींग विषय झाला आहे. AI तंत्रज्ञान मानवी बुद्धीला आणि कौशल्यांना आव्हान उभे करेल का, यामुळे बेरोजगारी वाढेल का? अशा विविध विषयांर चर्चा सुरू असतानाच स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे पहिल्यांदाच जगातील सर्वात स्मार्ट रोबोंची पत्रकार परिषद घेण्यात आली. हे सर्व रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ने ऑपरेट केले होते. यामध्ये जवळपास 3000 तज्ज्ञांसह 51 रोबो या परिषदेसाठी उपस्थित होते. यावेळी रोबोनी दिलेली उत्तरे खरोखरच मानवाला अवाक करणारी आहेत. “आम्ही हे जग माणसांपेक्षा चांगले चालवू शकतो. आमच्यात माणसांसारख्या भावना नाहीत, ज्यामुळे आम्ही सत्याच्या आधारे सर्व निर्णय ठामपणे घेऊ शकतो”, असे उत्तर या परिषदेत सहभागी सोफीया नावाच्या रोबोनो दिले आहे.
परिषदेत विचारल्या गेलेल्या विविध प्रश्नांना हे रोबो अगदी संयमीपणे सामोरे गेले. बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यांनी अगदी समर्पक आणि स्पष्टपणे दिली. भविष्यात तुम्ही तुमच्या निर्मात्याविरुद्ध बंड कराल का? असा प्रश्न विचारला असता रोबोटने “तुम्हाला असे का वाटते ते मला माहिती नाही. माझ्या निर्मात्यांनी मला नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. त्यात मी आनंदी आहे.” असे उत्तर देत रोबो आपल्यावर राज्य तर करणार नाहीत ना? माणसाला नेहमी पडणाऱ्या शंकेचे निरसन केले.
तुम्ही लोकांचे अस्तित्व संपवाल का? तुमच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत का? या प्रश्नावर सहभागी रोबो म्हणाला, ” मी लोकांसोबत मिळून काम करेन, माझ्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांना धोका होणार नाही.एकत्रितपणे आपण जगाला एक चांगले भविष्य देऊ शकतो.
थोडक्यात AI काय किंवा रोबो काय मानवी प्रतिभेतूनच निर्माण झालेली उत्पादने हाडामासांच्या आणि विश्वाला गवसणी घालणाऱ्या मानवाची जागा घेऊ शकणार नाहीत, हेच या परिषदेतील चर्चेतून अधोरेखित झाले आहे.
SL/KA/SL
9 July 2023