गोसेखुर्द धरणाचे १७ दरवाजे उघडले…

भंडारा, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे आठवड्याचे विश्रांतीनंतर रविवारच्या मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली, या पावसामुळे नदी नाले दुथडी वाहत होते तसेच गोसेखुर्द धरणाच्या क्षेत्रातही पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे धरणाचे सतरा दारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.
या मधून २०७५.९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढे येणाऱ्या पाऊस आणि नदीत येणारा पाण्याचा प्रवाह लक्षात घेवून दारे कमी ज्यास्त प्रमाणात उघडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ML/KA/SL
9 July 2023