मोफत प्रवासासाठी पुरुष झाला बुरखेधारी

, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील काही राज्यांमध्ये महीलांना एसटी च्या तिकीटामध्ये विशेष सवलत देण्यात येते. कर्नाटकात महिलांसाठी मोफत बससेवा योजना लागू करण्यात आली आहे. 11 जून 2023 रोजी शक्ती योजना सुरू करण्यात आली होती. या सेवेची अंमलबजावणी करणे हे कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या पाच निवडणूक आश्वासनांपैकी एक होते. त्याचा उद्देश महिलांना मोफत बससेवा देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. या बस सेवेचा लाभ घेताना एका पुरुष प्रवाशाला पकडण्यात आले आहे.
कर्नाटकातील धारवाड येथील सांशी बसस्थानकावर गुरुवारी एका 58 वर्षीय व्यक्तीला काही लोकांनी पकडले. शक्ती योजनेंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवासाचा लाभ घेण्यासाठी त्याने बुरखा परिधान केला होता, असा आरोप लोकांनी केला आहे.
वीरभद्र निंगय्या हा माणूस बस स्टँडवर बुरखा घालून बसला होता. त्यावेळी काही लोकांना तो पुरुषांसारखे वर्तन करताना दिसला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस आल्यानंतर वीरभद्रची झडती घेण्यात आली, त्यामध्ये त्याच्यासोबत एका महिलेच्या आधार कार्डची फोटोकॉपीही सापडली.
चौकशीत ही व्यक्ती विजयपुरा जिल्ह्यातील गोदागेरी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले. बेंगळुरूहून रेल्वेने तो सांशीला आला. बसस्थानकावर आल्यानंतर त्याला बुरखा असलेली एक बॅग मिळाली होती.वीरभद्रने पोलिसांना सांगितले की, बस स्टँडवर भीक मागता यावी म्हणून त्याने हा बुरखा घातला होता. पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीनंतर ताकीद देऊन सोडून दिले आहे.
SL/KA/SL
8 July 2023