पावसाची संततधार, घटप्रभा धरण भरले, सात बंधारे पाण्याखाली…

कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही मार्गावरील वाहतूक बंद झाली असून घटप्रभा धरण भरले आहे. गेल्या 24 तासात पंचमीची पातळी सहा फुटांनी वाढली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून आतापर्यंत संततधार पाऊस कोसळत आहे , त्यामुळे सहा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसानं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पंचगंगेची पातळी सहा पाणी 7 फुटांनी वाढली आहे त्यामुळे पंचगंगेवरील राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड आणि शिरोळ असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत .त्यामुळे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत
चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण भरलं आहे.
ML/KA/SL
8 July 2023