72 हुरेंच्या निर्मात्यांना पोलिस संरक्षण

 72 हुरेंच्या निर्मात्यांना पोलिस संरक्षण

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रपटांचे पेव फुटले आहे. संजय पूरण सिंग दिग्दर्शीत ‘ 72 हुरें’ या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर यावरून सातत्याने वादंग होत होते. कट्टरतावाद्यांच्या मोहात पडून तरुण कसे आत्मघातकी बॉम्बर बनतात, या चित्रपटाचा विषय आहे. चित्रपटात एका विशिष्ट समुदायाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे, असा आरोप ठेवत अशोक पंडित, गुलाबसिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर आणि किरण डागर हा निर्मात्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आज म्हणजेच 7 जुलै रोजी ‘ 72 हुरें प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराची आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. तेथे 24 तास पोलिस तैनात असतील.

अशोक पंडित यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेची विनंती केली होती. त्यांचे म्हणणे ऐकून पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. अशोक यांनी सांगितले की, मला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सुरक्षा मिळाल्याबद्दल त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अशोक यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले- आज आमचा चित्रपट 72 हुरें प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, माझ्या घरी आणि कार्यालयात सुरक्षा वाढवण्यात आल्याचे ऐकले आहे. मला वैयक्तिक सुरक्षाही देण्यात आली आहे. मला बऱ्याच दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सोशल मीडियावर अपमानास्पद प्रतिक्रियाही येत होत्या. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांकडून धमक्या येत आहेत. मी प्रेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने चित्रपटाला पाठिंबा द्यावा. दहशतवादाविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे.

SL/KA/SL

7 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *