Threads App ची Twitter ला जोरदार टक्कर, काहीतासांत कोट्यवधी डाऊनलोड्स
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तंत्रज्ञान विस्ताराच्या या जगात वापरकर्त्यांना सतत नाविन्यांची ओढ असते. हेच लक्षात घेत मेटा कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या थ्रेड्स (Threads) या नवीन सोशल मीडिया अॅप ला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशी कोट्यवधी युजर्सने थ्रेड्स (Threads) ला पसंती दर्शवली आहे. थ्रेड्स अॅप ट्विटरला टक्कर आहे. पहिल्याच दिवशी थ्रेड्स व्हायरल होत आहे. थ्रेड्सच्या लाँचिंगमुळे ट्विटरला धोका निर्माण झाला आहे. ट्विटरने मेटाच्या थ्रेड्सवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
मेटाने 6 जुलै रोजी लाँच केलेलं थ्रेड्स अॅप एलॉन मस्क यांच्या मालकीचं मायक्रो-ब्लॉगिंग अॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एकीकडे ट्विटरकडून विविध बदल करण्यात येत असताना आता थ्रेड्स ट्विटर समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आता ट्विटरने मेटा कंपनीला थ्रेड्स विरोधात खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, ट्विट आणि थ्रेड्समधील वाद कॉपीराइटवरून असल्याची माहिती समोर येत आहे. थ्रेड्सचं स्वरुप (Interface) ट्विटरसारखाच असल्याचा दावा ट्विटरने केला आहे. याशिवाय ट्विटरवर थ्रेड नावाचं फीचर आहे. जेव्हा एक जास्त शब्दांचं ट्विट अनेक भागांमध्ये विभागलं जातं, तेव्हा ते थ्रेडमध्ये विभागलं जातं. यामुळे ट्विटरने थ्रेड्सवर कॉपीराइटचा दावा केला आहे. या अहवालावर मेटा कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
थ्रेड्सची वैशिष्ट्ये
मेटा कंपनीने थ्रेड्स हे नवीन मायक्रोब्लॉगिंग अॅप लाँच केलं आहे. इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स अॅप बनवलं आहे. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची फिचर्स आणि संवाद साधण्याची पद्धत ट्विटरप्रमाणे आहेत. थ्रेड्स भारतासह 100 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. तुम्ही गुगल प्ले-स्टोअरवरून थ्रेड्स अॅप डाउनलोड करु शकता. तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंटवरून थ्रेड्सवर अकाऊंट सुरु करु शकता. जर तुमच्याकडे इंस्टाग्रामवर आधीपासून ब्लू टिक असेल म्हणजेच तुमचे इंस्टाग्राम खाते आधीच व्हेरिफाईट असेल तर थ्रेड्स अकाऊंटही आपोआप व्हेरिफाईट होईल.
SL/KA/SL
7 July 2023