देशभरात स्वच्छतेची व वनराईची चळवळ उभी राहावी..
नवी मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान सुरू आहे.यामध्ये विविध अभियानांचा समावेश आहे. यातील स्वच्छता हा विषय अभियानात आहेच.त्याच बरोबर पर्यावरणाचा देखील समावेश आहे.स्वच्छतेमुळे सजीवांचे आरोग्य चांगले राहते तर पर्यावरणा मुळे नैसर्गिक वातावरण उत्कृष्ट राहते. नैसर्गिक वातावरण चांगले असेल तर सजीवांना अत्यंत अत्यावश्यक असणारे प्राण वायू स्वच्छ मिळते.म्हणून देशभरात स्वच्छतेची व वनराईची चळवळ उभी राहावी असे प्रतिपादन राष्ट्रीय प्रतिदर्षण सर्वेक्षण विभागाचे सचिव डॉ.जी.पी.सामंता यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई बेलापूर येथील राष्ट्रीय प्रतिदर्ष सर्वेक्षण ( NSSO ) कार्यालय १ ते १५ जुलै दरम्यान या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहे.यामध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून स्वच्छतेचा एक भाग म्हणून पर्यावरण संरक्षणासाठी कचरा व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण विभागाचे केंद्रीय सचिव डॉ.जी.पी.सामंता या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
ML/KA/PGB
6 July 2023