मुसळधार पावसामुळे हाहाकार , एकाचा मृत्यू, गुरे ही मृत्युमुखी
जळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार माजला आहे.पावसाने केलेल्या तांडवामुळे नदी नाल्यांना अचानक आलेल्या पुरामुळे रावेर शहरातील दोन जण बेपत्ता झाले असून मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच रसलपूर मध्ये चार गुरांचा मृत्यु झाला तर एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे.
रावेर तालुक्यात रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली.अचानक पाऊसने जोर पकडला , दोन ते तीन तास मुसळधार पावसाने तांडव केले. यामुळे रावेर शहरातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर गाव नदी यात अचानक पाणी वाढले.नागझिरी नदीत एक व्यक्ती तर मात्रान नदीत रावेर शहरातील एक माजी नगर सेवक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मोरव्हाल येथील अभोडा नदीत एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर रसलपूर मध्ये बलेनो ही चार चाकी गाडी वाहून गेली असून गाडीतून उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे.Due to heavy rain, one person died, cattle died
रमजीपूर, रसलपूर,खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपूर मध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहे.महसूल प्रशासन तालुक्यात अजून कूठे नुकसान झाले आहे याचा शोध घेत आहे. महसूल प्रशासनाकडून तात्काळ बचत कार्य सुरू असून दोन गायब व्यक्तीचा शोध घेत आहे.
ML/KA/PGB
6 July 2023