भारताचे १४० स्टार्टअप्स अंतराळ क्षेत्रात कार्यरत

 भारताचे १४० स्टार्टअप्स अंतराळ क्षेत्रात कार्यरत

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात दिवसेंदिवस नेत्रदीपक कामगिरी करत आहे. याचा प्रत्यय नुकताच एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. कोरोनाकाळापूर्वी भारतात अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारे फक्त ५ स्टारटप्स होते. पण आता अवघ्या दोन-अडीच वर्षांनंतर आता भारतात अंतराळ तंत्रज्ञानावर १४० नोंदणीकृत स्टार्टअप कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्र भांडवल गुंतवणूकदारांसाठी भारतात सर्वात अधिक मागणीच्या क्षेत्रांपैकी एक आहे. २०२२ मध्ये अंतराळ स्टार्टअपने क्षेत्रात नव्या गुंतवणुकीत सुमारे ९८० कोटी रु.ची भर पडली आहे.

१९६३ मध्ये भारताने पहिल्यांदा अग्निबाण प्रक्षेपण केले होते. त्यानंतर रशिया आणि अमेरिकेला टक्कर देत भारत आता अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक प्रमुख देश म्हणून पुढे आला आहे. किफायतशीर अंतराळ तंत्रज्ञान निर्माण करणे हे भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे यश आहे. आज जगातीव बहुतांश देश उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताची मदत घेतात.

आत्तापर्यंत अंतराळ संशोधन क्षेत्रातील कार्य सरकारी सहकार्यानेच झाल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या दोन वर्षांत १०० हून अधिक अंतराळ क्षेत्राशी निगडीत स्टार्टअप्स पुढे आल्यामुळे खाजगी क्षेत्रातही हे संशोधन मोठ्या प्रमाणावर होऊ घातल्याचे आणि गुंतवणूकदारांकडूनही या उपक्रमांना चांगला पाठींबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

SL/KA/SL

5 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *