टीम इंडियाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी हा खेळाडू

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याची टीम इंडियाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री ही नियुक्ती जाहीर केली. मुळात आगरकरांना मुख्य निवडकर्ता बनवण्याची तयारी यापूर्वीच केलेली होती. माजी क्रिकेटर चेतन शर्मा हे याआधी या पदी होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. या पदासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव आघाडीवर होते. 45 वर्षीय माजी भारतीय वेगवान गोलंदाज आगरकर यांनी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 58, 58, 288 आणि तीन विकेट्स घेतल्या.
अजित आगरकर हा एक अभ्यासू क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. आंतरारष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याने बरेच प्रयोग केले होते.अजित आगरकर मुंबईकडून क्रिकेट खेळलेला आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अजित आगरकर हा मुंबईचा निवड समिती अध्यक्ष बनला होता. त्यामुळे निवड समिती अध्यक्षाने नेमकी भूमीका काय असते, हे त्याला उत्तमपणे अवगत आहे. त्याच्या प्रयोगशील आणि अभ्यासूवृत्तीचा टिम इंडियाला चांगला फायदा होऊ शकतो.
SL/KA/SL
5 July 2023