फोटो बाबत शरद पवारांनी दिला सज्जड दम

 फोटो बाबत शरद पवारांनी दिला सज्जड दम

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे त्यांनी माझा फोटो कुठेही वापरू नये असा सज्जड दं शरद पवार यांनी फुटीर गटाला दिला आहे. माझ्या जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे त्यामुळे ही बाब आपण स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.Regarding the photo, Sharad Pawarani gave a sober voice

मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे , ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्याच पक्षाने माझा फोटो वापरावा अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या आशीर्वादानेच आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत असे अजित पवार गटाने पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर राष्ट्रवादीतील नवीन मंत्र्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स राज्यभरात त्यांच्या समर्थकांनी लावले आहेत त्यावर शरद पवार यांचे फोटो लावण्यात आले आहेत,त्यानंतर आज लगेचच शरद पवार यांनी हे स्पष्ट केले आहे.

याआधी शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावले , त्यावर माझ्या वडिलांचे फोटो का लावले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता, काही लोकांनी आपले वडिलच चोरले असल्याचा आरोपही उध्दव आणि आदित्य ठाकरे वारंवार करीत आहेत. मात्र बाळासाहेब जिवंत नसल्याने त्यांच्या फोटोवर आलेला आक्षेप शिंदे गटाने न जुमानता तेच आमचे दैवत असून त्यांचेच विचार आम्ही पुढे नेत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी तील फुटीवर शरद पवार यांचा दम किती उपयोगी ठरतो हेच पहायचे.

ML/KA/PGB
4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *