देशाचे समर्थ नेतृत्व नरेंद्र मोदीच करू शकतात , म्हणूनच आम्ही सरकारमध्ये

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतर म्हणजे 1994 सालानंतर एका नेत्याच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदी यांना मोठा पाठिंबा आहे, त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार मध्ये सामील झालो असे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला.
आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस चर्चा सुरु होती, देशपातळीवरील आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करुन विकासासाठी आम्ही सरकार मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला असे अजित पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत. देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत, म्हणूनच त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. विकासाला महत्व देण्यासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय. शुक्रवारी आपण विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला असे ते म्हणाले.
इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. तरुणांना संधी देणार. त्यामुळे आदिती तटकरे, संजय बनसोडे या तरुणांना संधी दिली, महिला, आदिवासी, ओबीसींना मोठ्या प्रमाणात सत्तेत संधी दिली आहे.
आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना असून सुध्दा विकासकामे केली. आपण विकासाला महत्व देऊनच काम करतो, टीका टिपणीला महत्व देत नाही. पक्षातल्या बहुतेकांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार बरोबर आहोत असे अजित पवार म्हणाले.Only Narendra Modi can lead the country effectively, that’s why we in the government
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आणि पक्षाच्या चिन्हावर या पुढच्या निवडणुका लढविणार.
घड्याळ या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढविणार आहोत. आम्ही शिवेसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप बरोबर सुध्दा जाऊ शकतो , नागालँण्डमध्ये पक्ष यापूर्वीच भाजप बरोबर गेला आहे. पक्ष वाढीसुध्दा आम्ही सर्वस्व पणाला लावणार आहोत. काही आमदार बाहेर आहेत, संध्याकाळपर्यंत ते मुंबईत पोहोचतील. पक्षाचे आमदारांसह कार्यकर्ते सुध्दा आमच्यासोबत आहेत. लोकशाहीत बहुमताला महत्व, त्यामुळे बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्ष आमच्या सोबत आहे, नेते आमच्या सोबत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेतला आहे असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातल्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत आलोय, राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले त्यामुळे सहकारी पक्षांना सोबत घेऊनच राज्यातील सत्ता चालवावी लागेल, राज्याचं आणि देशाचं हित बघुनच सत्तेत येण्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला असे अजित पवारांनी यांनी सांगितले.
ML/KA/PGB
2 July 2023