ही फॅन्टसी गेम कंपनी टीम इंडीयाची मुख्य प्रायोजक
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पावधीतच बहुतांश लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये दाखल होऊन लोकप्रिय ठरलेल्या DREAM-11 या फँन्टसी गेम कंपनीने आता यशाचे अजूनक शिखर गाठले आहे. DREAM-11 ने टीम इंडियाच्या जर्सीचे मुख्य प्रायोजकत्व हक्क ३५८ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. हा करार 3 वर्षांसाठी आहे.या आधी BYJU ही कंपनी टीम इंडीयाच्या जर्सीवर झळकत होती. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर BYJU चा करार संपला. अशाप्रकारे, ३ महिन्यांपासून भारताचा एकही जर्सी प्रायोजक नव्हता. शुक्रवारी रात्री उशिरा बीसीसीआयने ड्रीम-11 सह भागीदारीची घोषणा केली.
वेस्ट इंडिज दौऱ्यावरील भारतीय संघाच्या जर्सीवर ड्रीम-11 चा लोगो दिसणार आहे. भारताचा पुरुष आणि महिला संघ त्यापूर्वी दुसरी कोणतीही मालिका खेळणार नाही. वेस्ट इंडिजचा दौरा १२ जुलैपासून सुरू होणार आहे. येथे टीम इंडिया 2 कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळणार आहे. ड्रीम-11 चा करार जून २०२५ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापर्यंत राहील.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, ‘ड्रीम-11 ने बीसीसीआयशी आधीच डील केली आहे. बीसीसीआयसोबत पुनरागमन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारतातील एकदिवसीय विश्वचषक पाहता हा करार महत्त्वाचा मानला जातो. एकत्रितपणे, दोन्ही भागीदार टूर्नामेंटमध्ये चाहत्यांचा सहभाग आणि त्यांचा अनुभव वाढवतील.
ड्रीम-11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन म्हणाले, ‘कंपनी बऱ्याच काळापासून बीसीसीआय आणि भारतीय खेळाडूंसोबत काम करत आहे. राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रायोजक बनणे ही कंपनीसाठी अभिमानाची बाब आहे. भारतातील क्रीडा परिसंस्था वाढवण्यावरही आम्ही भर देत आहोत.
SL/KA/SL
1 July 2023