दूधगंगा नदी पात्रात आढळल्या मानवी कवट्या

 दूधगंगा नदी पात्रात आढळल्या मानवी कवट्या

कोल्हापूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली इथल्या नदी किनाऱ्या जवळ दूधगंगा नदी पात्रात अज्ञात व्यक्तींच्या डोक्याच्या चार कवटी आढळून आल्या आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या लोकांच्या या कवट्या निदर्शनास आल्या. त्यानंतर कागल पोलिसात याबाबत कळविण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा इथं दूधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी आणि जनावरं धुण्यासाठी येत असतात. आज नेहमीप्रमाणं पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्यानं मानवी व्यक्तीचा फक्त डोक्याचा भाग असलेली (कवटी) दिसून आली. या कवटीवर मांसाचा कोणताही भाग शिल्लक दिसत नव्हता.

त्यांनी ताबडतोब सिद्धनेर्लीचे पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती देऊन पोलीस स्टेशनला कळविण्याबाबत सांगितलं.
कागल पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळताच त्यांनी सदर मानवी कवटी ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच परिसरात आणखी तीन कवट्या आढळून आल्याचं समजताच कागल पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पुन्हा रवाना झाले आणि उर्वरित कवट्याही ताब्यात घेण्यात आल्या.

या मानवी कवट्यांवर कोणत्याही प्रकारे मांस नसल्यानं ह्या किती दिवसांपूर्वीच्या आहेत, हे सांगता येत नाही. या
कवट्या इथं आल्या कश्या, एकाच वेळी चार कवट्या एकाच ठिकाणी सापडल्या असल्यानं मोठं गूढ निर्माण झालं आहे. अशा प्रकारच्या मानवी कवट्या सापडल्याने परिसरात उलट उलट चर्चा सुरू असून हा नेमका काय प्रकार आहे हे न समजल्याने त्याचे गूढ वाढले आहे.सध्या कागल पोलिसांनी या कवट्या ताब्यात घेतल्या असून अधिक तपास चालू आहे.

ML/KA/SL

1 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *