परदेशी गुंतवणूकदारांच्या जोरदार पुनरागमनामुळे बाजाराचा (Stock Market) नवा विक्रमी उच्चांक…

जितेश सावंत, दि. १ : ३० जून रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत 3 टक्के बढत घेतली आणि नवा विक्रमी उचांक नोंदवला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे जोरदार पुनरागमन (strong comeback of foreign institutional investors ) , करंट अकाऊंट मधील कमी झालेली तूट, म्युच्युअल फंड इक्विटी फ्लोतील वाढ, कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती, ग्रामीण क्षेत्रातील वाढलेली मागणी आणि नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला.
बाजाराने नवा विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला. सेन्सेक्सने 64,768.58 आणि निफ्टीने 19,201.70 ह्या ताज्या विक्रमी उच्चांकांना स्पर्श केला. Global Markets – शुक्रवारी ग्लोबल मार्केट मध्ये शानदार तेजी दिसून आली. यूएस बाजार मोठ्या तेजीसह बंद झाले, Dow Jones 285 अंक आणि Nasdaq मध्ये जवळजवळ 1.5% तेजी झाली. युरोपीय बाजारातही चांगली खरेदी दिसून आली.
बाजाराचे वाढलेले मूल्यांकन(valuation) हा थोडा चिंतेचा विषय असल्याने गुंतवणूकदारांनी वेळोवेळी नफा बुक करावा.
पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक बाजारातील घडामोडी व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका याकडे असेल.
बाजाराने या आठवड्यात विक्रमी पातळी गाठली.
शुक्रवारी निफ्टीने 19189चा बंद भाव दिला. विक्रमी पातळी गाठल्यानंतर बाजारात नफावसूली वाढली. बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हर बॉट झोन (overbought) आहे. निफ्टीने विक्रमी बंद दिला आहे . निफ्टी 19300-19373 हे स्तर गाठू शकते.तर निफ्टीसाठी 19024-18908-18861 हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल.
सेन्सेक्स सपाट बंद झाला.
संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजार किरकोळ वाढीसह उघडला, परंतु दिवसभरात निराशाजनक सत्र दिसून आले.कमकुवत आशियाई आणि युरोपीय संकेतांचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला.जागतिक बाजारातील अनिश्चिततेच्या माहोलामुळे गुंतवणूकदार खरेदी करताना दिसत नव्हते.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 9.37 अंकांनी घसरून 62,970 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 25.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,691.20 चा बंद दिला. Sensex ended on a flat note.
सेन्सेक्स 446 अंकांनी वाढला.
बुधवारच्या F&O एक्सपायरीच्या पूर्वी, शॉर्ट कव्हरिंगमुळे आशियाई आणि युरोपीय निर्देशांकांमध्ये कमकुवत कल असूनही भारतीय बाजारात मोठी तेजी आली.गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बँकिंग आणि रियल्टी स्टॉकवर लक्ष केंद्रित केले. HDFC विलीनीकरणाला चालना मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. दिवसाच्या उत्तरार्धात बाजारात जोरदार खरेदी झाली. परंतु निफ्टीला ऑल टाईम हाय पातळीजवळ जाण्यास पुन्हा अपयश आले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 446.03 अंकांनी वधारून 63,416.03 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 126.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18817.40 चा बंद दिला. Sensex zooms 446 points.
बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला.
विकली एक्सपायरियाच्या दिवशी निफ्टीने शेवटी आपला ऑल टाइम हाय नोंदवला. बाजार विक्रमी स्तरावर उघडला आणि दिवस पुढे जात असताना निफ्टी आणि सेन्सेक्सने इंट्राडे आधारावर अनुक्रमे 19,011.25 आणि 64050.44 हा विक्रमी उच्चांक गाठला.निफ्टीने अखेर मागील उच्चांक ओलांडण्यात यश मिळवले आणि एक्स्पायरी दिवशी 19,000 चा मोठा अडथळा पार केला.सेन्सेक्सने 22 जून रोजी नोंदवलेला 63,601.71 चा मागील उच्चांक ओलांडून नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला.
अमेरिका आणि युरोपीय बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर व परकीय भांडवलाचा ओघ वाढल्याने बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 499.39 अंकांनी वधारून 63,915.42 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 154.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,972.10 चा बंद दिला. Market hits record high.
बाजार नवीन उच्चांकांवर
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने आपली विक्रमी घोडदौड सुरूच ठेवली. बाजारातील तेजी सलग तिसऱ्या सत्रातही कायम राहिली. ऑटो आणि माहिती तंत्रज्ञान समभागातील तेजीमुळे बाजाराने नवा विक्रमी उचांक प्रस्थापित केला.
सेन्सेक्सने 64,768.58 आणि निफ्टीने 19,201.70 ह्या ताज्या विक्रमी उच्चांकांना स्पर्श केला. BSE सेन्सेक्स जवळपास 800 अंकांपेक्षा जास्त वाढला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 803.14 अंकांनी वधारून 64,718.56 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 216.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,189 चा बंद दिला. Market on new highs .
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )
jiteshsawant33@gmail.com