ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्राची दारे झाली बंद

चंद्रपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाळ्यातील चार महिने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील भाग वन्यजीव पर्यटन सध्या बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी पर्यटकांना सोनम वाघिणीचे मनसोक्त दर्शन झाले.The gates of the core area of Tadoba-Andhari Tiger Reserve have been closed
येत्या एक ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा गाभा क्षेत्रातील पर्यटनाला सुरुवात होणार आहे. जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वन्यजीव वैविध्य. या प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी हजारो वन्यजीव अभ्यासक व पर्यटक दरवर्षी दाखल होतात. 30 जून ही तारीख या व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील वन्यजीव पर्यटनाची अंतिम तिथी असते. एक जुलैपासून गाभा क्षेत्रातील वन्यजीव पर्यटनावर बंदी लावली जाते.
यंदाही 30 जून रोजी गाभा क्षेत्रातील पर्यटन बंद करण्यात आले आहे. आज शेवटच्या दिवशी मात्र सोनम वाघिणीने पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले. एक ऑक्टोबर पासून गाभा क्षेत्रातील पर्यटन पुन्हा एकदा प्रारंभ करण्यात येते. असे असले तरी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर अर्थात बाह्यभागातील वन्यजीव सफारी सुरळीत सुरू राहणार आहेत. गाभा क्षेत्रातील वने व वन्यजीव वैविध्य बफर क्षेत्रातही अनुभवता येत असल्याने मागील काही वर्षात बफर क्षेत्रातील पर्यटन देखील पर्यटकांनी फुलून जाते. त्यामुळे पावसाळ्यात देखील आपण वन्यजीव पर्यटनाचा व व्याघ्र सफारीचा विचार करत असाल तरीही ताडोबातील जंगल आपले स्वागत करीत आहे.
ML/KA/PGB
1 July 2023