लक्झरी बस पेटली 25 प्रवाशांचा जळून मृत्यू

बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्हयातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ खाजगी लक्झरी बसने पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय तर दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
नागपूर वरून एम एच 29 B E 1819 क्रमांकांची भारत ट्रॅव्हलची लक्झरी बस प्रवासी घेऊन पुणेकडे जात असताना बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गवरील सिंदखेडराजा येथील चॅनल नंबर 333 जवळ या लक्झरी बसला आग लागली . या आगी मध्ये लक्झरी बसमधील 25 प्रवाशांचा जागीच जळून जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवासी जबरदस्त भाजले असून त्यांना संभाजीनगर येथे उपचार करता दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्झरी बस चालकाचे गाडीवरील संतुलन गेल्याने ही बस रस्त्यालगतच्या कठड्याला जाऊन धडकली त्यानंतर बसच्या डिझेल टॅंक मध्ये आग लागली आणि बसने पेट घेतला. आगी नंतर जेमतेम पाच – सहा प्रवासी बाहेर निघू शकले. उर्वरित 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला, त्यामध्ये तीन बालकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे.Luxury bus caught fire, 25 passengers burnt to death
ML/KA/PGB
1 July 2023