नागपुरातील ईतवारी आता नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेशन

नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ईतवारी रेल्वे स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्टेशन असे नाव देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने आदेश काढले असून लवकरच नामकरणाचा कार्यक्रम होणार आहे.Etwari in Nagpur now Netaji Subhash Chandra Bose Station
ईतवारी रेल्वे स्थानकाला थोर स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आल्याने नागपुरात आनंद व्यक्त केला जात आहे…महत्वाचं म्हणजे इतवारी रेल्वे स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यासाठी नागपूर महापालिकेने 2022 मध्ये सभागृहात एकमताने ठराव पारीत केला होता.. त्यानंतर राज्य सरकारने 23 ऑगस्ट 2022 मध्येच या नावाला मान्यता देत हा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठविला होता.. या प्रस्तावाला आता केंद्र सरकारने सुद्धा मंजुरी दिल्याने नागरिक, लोकप्रतिनिधीनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
ML/KA/PGB
30 Jun 2023