वारकरी भक्तांच्या आरोग्य तासापणीसाठी रांगा…

 वारकरी भक्तांच्या आरोग्य तासापणीसाठी रांगा…

सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. अशाच रांगा सध्या पंढरपुरात वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता या ठिकाणी देखील लागल्या गेल्या. मात्र या रांगा विठ्ठल दर्शनासाठी नसून शासनाच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठीच्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ लाख भाविकांची आरोग्य तपासणी झाली आहे.Varkari devotees queue up for health check-up…

आरोग्य विभागाकडून पंढरपुरात तीन ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच रांगा लावल्या. एकूण पस्तीस प्रकारच्या तपासण्या यामध्ये होत आहेत. रक्त तपासणी ,नेत्र तपासणी ते सोनोग्राफीपर्यंतची सर्व व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शिबिरामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत ते स्वतः जातीने लक्ष देऊन आहेत. या शिबिरासाठी डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी आणि आरोग्यदूत असे एकूण नऊ हजार लोक वारकरी भक्तांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.

या शिबिरामध्ये तपासणी झाल्यानंतर औषध उपचार मिळत आहेत. तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील सर्व उपचार आणि शास्त्रक्रिया प्रत्येक भाविकाला आपापल्या गावात मोफत मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढीला आरोग्याची वारी , पंढरीच्या दारी ही यशस्वी ठरताना दिसत आहे.

ML/KA/PGB
28 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *