वाखरी नजिक पार पडले माऊलींचे गोल रिंगण …
सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज वाखरी नजिक संपन्न झाले. बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगणाचा सोहळा रंगला यामध्ये सर्वप्रथम विणेकरी व टाळकरी धावले. यानंतर अश्व रिंगणात धावले.Mauli’s round arena was held near Wakhri…
यावेळी मानाच्या अश्विनी माऊली आणि विठुरायाच्या गजरात तीन फेऱ्या पूर्ण केल्या. यानंतर सर्वांनी माऊली माऊली असा एकच गजर केला. यानंतर पालखी सोहळा वाखरीत येऊन विसावला. बुधवारी या सर्वांच्या पालख्या एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात येऊन विसावणार आहेत.
ML/KA/PGB
27 Jun 2023